कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व तयार झाले आहे. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ४:३० वाजता प्रख्यात अभिनेते, समाजसेवक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणारे व्यक्तिमत्त्व नाना पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्या संवादमालिका आयोजित करण्याची परंपरा संजय घोडावत विद्यापीठामध्ये सातत्याने जपली आहे. त्या परंपरेत आणखी एक मोलाची भर म्हणून नाना पाटेकर यांचे मार्गदर्शन ठरणार आहे. साधेपणा, संवेदनशीलता आणि समाजाशी असलेल्या सखोल नात्यामुळे नाना पाटेकर हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत मानले जातात. त्यामुळे त्यांचा संवाद विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाना पाटेकर यांच्या “एक व्यक्तिमत्व, अनेक पैलू” या जीवनतत्त्वज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन कार्यक्रमातून होणार आहे. सामाजिक जबाबदारी, प्रामाणिकपणा, कार्यशिस्त आणि मानवतेची जाणीव या मूल्यांची शिकवण देणाऱ्या त्यांच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. हा कार्यक्रम घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. उद्धव भोसले यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
——————————
घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी नाना पाटेकर साधणार संवाद
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
27.9
°
36 %
4.6kmh
6 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
26
°
Sun
27
°

