कोल्हापूर :
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) कोल्हापूर व वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परीक्षाविधीन प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत परीक्षाविधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये विविध क्षेत्रातील गट ब अधिकाऱ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळ तसेच घालवाड येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली.
विविध भागातील प्रशासनामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना प्रशासनात सुव्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती व्हावी या दृष्टीने दिनांक १५ ते १९ डिसेंबर या हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ४१ प्रशिक्षणार्थीसह अधिकारी सहभागी झाले आहेत.
वनामती नागपूरच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. अर्चना सोळंकी, प्रशिक्षण समन्वयक वसुधा नाईक, प्रशासकीय सहाय्यक विनोद डोंगरदिवे, रामेती कोल्हापूरचे प्राचार्य अजय कुलकर्णी, सहाय्यक संचालक तानाजी पाटील, सहाय्यक संचालक मयुरा काळे, सहाय्यक संचालक चांगदेव गायकवाड, तंत्र सहाय्यक युवराज माने यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी सर्वच प्रशिक्षणार्थी व अधिकाऱ्यांनी श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील प्रयोगशाळेला भेट दिली. यामध्ये माती, पाणी व पाने परीक्षण यासंदर्भातील कारखान्याने तयार केलेल्या अहवालाची माहिती घेतली. ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न, एकरी १०० टन, दीडशे टनापर्यंत येत असलेले उत्पादन, जमीन क्षारपडीची समस्या, त्यावर कारखान्याने केलेले प्रयोग, क्षारपड मुक्तीचे २९ गावामध्ये १० हजार एकरावरती झालेले काम, त्याची यशस्विता यांची विस्तृतपणे माहिती दिली. तर इंजिनीयर कीर्तीवर्धन मरजे यांनी क्षारपड मुक्तीसाठी राबवलेल्या सच्छिद्र निचरा प्रणाली यासंदर्भात संपूर्णपणे तांत्रिक माहिती सांगितली. प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले. कारखाना प्रक्षेत्र पाहणीमध्ये ऊस तोडणीपासून साखर तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली.
घालवाड येथे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पासही भेट देण्यात आली. यामध्ये मुख्य पाईपलाईन, अंतर्गत पाईपलाईन, निचरा प्रणालीचे कार्य, जमीन सुधारणेनंतर येत असलेले पिकांचे उत्पादन आदींची सखोल माहिती घेतली. श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी राबविलेल्या या क्षारपडमुक्तीच्या कामाचे सर्वांनीच कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय काम करीत असताना येथे घेतलेली माहिती निश्चितच आपणाला उपयोगी पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
परीक्षाविधीन अधिकाऱ्यांची श्री दत्त साखर कारखाना आणि क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.4
°
C
28.4
°
28.4
°
79 %
7.8kmh
100 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

