Homeशैक्षणिक - उद्योग श्री दत्त साखरकडून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २५ कोटी ९५...

श्री दत्त साखरकडून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २५ कोटी ९५ लाख जमा

कोल्हापूर :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., शिरोळ या संस्थेकडे गाळप हंगाम सन २०२५-२६ मध्ये दि. २/११/२०२५ ते १५/११/२०२५ अखेर गाळपास ७५,२४०.९० मे. टन इतका ऊस गाळपास उपलब्ध झाला होता. गाळपास उपलब्ध झालेल्या या ऊसास संस्थेने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे एकरकमी विनाकपात प्रतिटन रक्कम रु. ३,४५० प्रमाणे होणारी रक्कम रु.२५ कोटी ९५ लाख ८१ हजार १६० इतकी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी दिली.
कारखान्याने सदरची रक्कम जमा करुन ऊस दराबाबतची विश्वासार्हता जोपासली आहे. कारखान्याचे गाळप अतिशय चांगल्या पद्धतीने व क्षमतेने चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप केला जाणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आपण पिकवलेला व कारखान्याकडे नोंद दिलेला सर्व ऊस गाळपास उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहनही गणपतराव पाटील यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
65 %
1.5kmh
0 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °

Most Popular

You cannot copy content of this page