• पूरग्रस्तांना शालेय व जीवनावश्यक साहित्याची मदत
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध संघामार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून जमलेल्या निधीचा वापर गरजू लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू व शालेय साहित्य खरेदीसाठी करण्यात आला. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शालेय व जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली.
गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानातून साखर, तेल, रवा, पिठ्ठी, डाळी, कडधान्य, साबण, ब्लॅकेट, रजई या जीवनावश्यक वस्तू तसेच वही, पेन, स्कूल बॅग यासारखे शालेय साहित्य एकत्र करून १,००० पॅकेटस तयार केले गेले आहेत. ही मदत सामग्री रविवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व संचालक मंडळ, आयटकचे व संघटनेचे पदाधिकारी, गोकुळचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त भागाकडे वितरीत करण्यात आली.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांकडून जमा झालेली रक्कमेतून गरजू लोकांसाठी शालेय उपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तूचे पॅकेस् व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाचे कर्मचारी आणि संघटनेचा हा मदतीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा समाजोपकारी वृत्तीमुळेच आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत मदत मिळू शकते. गोकुळ परिवाराने संकटाच्या काळात दिलेला हा मदतीचा हात समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा उत्कृष्ट प्रत्यय देतो.
यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. सदाशिव निकम म्हणाले की, गोकुळचे कर्मचारी आपल्या सामाजिक बांधिलकीसाठी नेहमीच पुढाकार घेत असतात गोकुळमध्ये आयटक पुरस्कृत सर्व कर्मचारी बंधू-भगिनींची कर्मचारी संघटना असून, या संघटनेच्या माध्यमातून संघाने अनेक सामाजिक हिताचे उपक्रम सातत्याने राबवले आहेत. राष्ट्रीय आपत्तीच्याप्रसंगी ही वृत्ती विशेषत्वाने दिसून येते.
याप्रसंगी माजी आमदार केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, आयटकचे राज्याचे सदस्य दिलीप पोवार, आयटकचे जिल्हा कमिटी सदस्य एस. बी. पाटील, आयटकचे जिल्हा कमिटी सेक्रेटरी रघुनाथ कांबळे, अध्यक्ष मल्हार पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, संभाजी शेलार, संदेश पाटील, लक्ष्मण आढाव, योगेश चौगुले, कृष्णा चौगुले आणि संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी गोकुळ कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

