कोल्हापूर :
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य व नाट्य या अभिजात कलांच्या अभिवृद्धीसाठी गेली १४१ वर्षे कार्य करीत असणाऱ्या गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर आणि दादर माटुंगा सांस्कतिक केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे छापील माहितीपत्रक व प्रवेश अर्ज गायन समाज देवल क्लब येथे सकाळी १०:३० ते ६ या वेळेत उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक महाविद्यालयाला ५ स्पर्धक पाठवता येतील.
प्रवेश अर्ज दि. २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत संस्थेत पोहोचणे आवश्यक आहे. देवल क्लबच्या सहसंयोजानाने गेली २१ वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरु असून हृषीकेश रानडे, प्राजक्ता जोशी, पुष्कर लेले, विभावरी आपटे, मधुरा दातार, तनुजा जोग, सायली जोशी, अभिजित कोसंबी, शर्वरी जाधव, संपदा माने, प्रल्हाद जाधव, गौतमी चिपळूणकर यासारख्या नव्या दमाची पिढी उभी करण्यात या स्पर्धेने महत्वाची भूमिका बजावली आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु. २०० असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२५ आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती देवल क्लब कार्यालयात उपलब्ध असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन देवल क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.
आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
mist
28
°
C
28
°
27.9
°
83 %
2.6kmh
75 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°