Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदच्या सार्जंट श्रीहरी शिपुगडे आणि जेयुओ वैष्णवी ढेंगे यांचे यश

विवेकानंदच्या सार्जंट श्रीहरी शिपुगडे आणि जेयुओ वैष्णवी ढेंगे यांचे यश

कोल्हापर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेना सार्जंट श्रीहरी शिपूगडे व जेयुओ वैष्णवी ढेंगे यांनी अनुक्रमे ऑबस्टॅकल आणि टेन्ट पिचिंग या प्रकारामधून दिल्लीच्या शिबिरापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या देशभरातील १३ लाख मुलांमधून २५० छात्रांची निवड केली जाते. यामध्ये या दोघांनी बाजी मारली आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेमधून छात्रांच्या अंगभूत गुणांना वाव मिळण्यासाठी आणि सक्षम नेतृत्व समाजाला व देशाला मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या शिबिरांचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर केले जाते. राष्ट्रीय थलसेना कॅम्पच्या माध्यमातून छात्रांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेची कसोटी आणि चाळण युनिट, बटालियन, ग्रुप, डायरेक्टरेट आणि राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. ही सर्व शिबिरे कोल्हापूर, अमरावती आणि दिल्ली येथे संपन्न होतात. विवेकानंद कॉलेजमधील सार्जंट श्रीहरी शिपूगडे व जेयुओ वैष्णवी ढेंगे यांनी अनुक्रमे ऑबस्टॅकल आणि टेन्ट पिचिंग या प्रकारामधून दिल्लीच्या शिबिरापर्यंत यशस्वी वाटचाल केली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या देशभरातील १३ लाख मुलांमधून २५० छात्रांची निवड केली जाते. यामध्ये यांनी बाजी मारत महाविद्यालयाच्या यशस्वीतेची पताका फडकवत ठेवली आहे.
या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, एनसीसी विभाग प्रमुख मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलावडे, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, ५ आणि ६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी स्टाफ आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page