कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधील (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ग्रीन क्लब व सोशल क्लब आयोजित पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रम श्री शाहू छत्रपती मिल्स चौक येथे यशस्वीरित्या पार पडला.
यासाठी नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. एनआयटीकडून हा उपक्रम वर्ष २००७ पासून कोटीतीर्थ येथे दरवर्षी राबवला जातो. यंदा उपक्रमाचे १९वे वर्ष आहे.
या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. रविंद्र यादव, प्रा. प्रविण जाधव, प्रा. सुभाष यादव व प्रा. संग्रामसिंह पाटील सहभागी होते. ४०० वर मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन या टीमकडून करण्यात आले. उपक्रमासाठी प्रा. विक्रम गवळी, अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे यांचे सहकार्य तर संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
एनआयटीचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
82 %
9.7kmh
100 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

