कोल्हापूर :
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात १६३ अर्ज प्राप्त झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.धीरजकुमार, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सोमवारी झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात १६३ अर्ज प्राप्त झाले. यापैकी पोलीस अधीक्षक कार्यालय- २४, कोल्हापूर महानगरपालिका- २०, इचलकरंजी महानगरपालिका- ९, जिल्हा परिषद- ३५, सीपीआर- २, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण महामंडळ- ३, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख- ८, सहकार विभाग- ३, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण- १, नगरपालिका प्रशासन विभाग- ४, जिल्हा पुरवठा अधिकारी- १, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती- २, जिल्हा मुद्रांक अधिकारी- १, अन्नधान्य वितरण अधिकारी कोल्हापूर शहर- ३, तहसिलदार गडहिंग्लज- २, तहसिलदार करवीर- १४, विमानतळ- १, तहसिलदार शिरोळ- ५, सार्वजनिक बांधकाम विभाग- २, आरटीओ- १, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी-१, तहसिलदार हातकणंगले- ५, उपविभागीय अधिकारी पन्हाळा- २, तहसिलदार पन्हाळा- २, तहसिलदार राधानगरी- १, अप्पर तहसिलदार इचलकरंजी- २, निवासी उपजिल्हाधिकारी- ४, तहसिलदार महसूल- १, कार्यकारी अभियंता ग्रामसडक योजना- २, पाटबंधारे विभाग- १, एस.टी.महामंडळ- १ असे एकूण १६३ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६३ अर्ज प्राप्त
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
6.8kmh
100 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°