फ्रीस्टाइल फुटबॉल या कलेत सातत्याने नवे शिखर गाठणारा संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी प्रणव अशोक भोपळे याने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर ‘ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चौथ्यांदा आपले नाव नोंदवले.
यावेळी प्रणवने “मोस्ट फुटबॉल सॉसर बॉल हेड स्टॉल टु नोस स्टॉल ट्रानसिशन इन ३० सेकंदस” या प्रकारात अवघ्या ३० सेकंदांत ५६ वेळा फुटबॉल कपाळावरून नाकावर फिरवून एक अद्वितीय विक्रम प्रस्थापित केला. याची अधिकृत नोंद ‘ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली असून, त्याचे प्रमाणपत्र त्याला नुकतेच प्राप्त झाले.
या विक्रमी कामगिरीचे प्रात्यक्षिक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दिले गेले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी त्याच्या कौशल्याचे प्रामाणिकपणे निरीक्षण केले.
या विक्रमामागे संजय घोडावत शिक्षण समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, सोहन तिवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रात्यक्षिकवेळी साक्षीदार म्हणून स्पोर्ट्स ऑफिसर सूर्यजीत घोरपडे, फुटबॉल कोच अरुण पाटील, भरत पाटील, अमित कोडक, उमेश घोडके, श्रेयस रजपूत, पंकज तोरसे हे क्रीडाक्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
प्रणवच्या यशामध्ये त्याचे आई-वडील व मोठा भाऊ यांचेही मोठे योगदान आहे. त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन त्याला कायम मिळाले आहे.
त्याचे या आधीचे तीन विक्रमही थक्क करणारे आहेत. या आधी प्रणवने तीन ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. चौथ्या विक्रमासह तो देशातील आघाडीच्या फ्रीस्टाइल फुटबॉल खेळाडूंमध्ये गणला जात आहे.
घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी प्रणव भोपळे याचे चौथे वर्ल्ड रेकॉर्ड!
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8
°
C
28.8
°
28.8
°
80 %
10.1kmh
100 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°