Homeकला - क्रीडाराष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत ७५ वर्षांवरील गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपद

राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धेत ७५ वर्षांवरील गटात महाराष्ट्र संघाला विजेतेपद

कोल्हापूर :
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ७५ वर्षांवरील पुरुष गटात महाराष्ट्र संघाने, तर ८० वर्षांवरील पुरुष गटात गुजरात संघाने विजेतेपद पटकावले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत ७५ वर्षावरील गटात अंतिम फेरीत पिनाकिन संपत, सतीश कुलकर्णी यांच्या विजय कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने चंदीगढ संघाचा ३-० असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले.
८० वर्षांवरील गटात अंतिम लढतीत गुजरात संघाने कर्नाटक संघाचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. विजयी संघाकडून
इंद्रेश पुरोहित, चिमणलाल विधानी यांनी सुरेख कामगिरी बजावली.
६० वर्षांवरील गटात उपांत्यपूर्व फेरीत अजय कोठावळे, पराग जुवेकर, पुरषोत्तम मरकड यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने चंदीगढ संघाचा ३-० असा पराभव केला. तर, महाराष्ट्र ब संघाने बेंगळुरू संघाचा ३-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्र ब संघाकडून समीर हळदुळे, अशोक कळंबे, नितीश धाकप्पा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गुजरात संघाने गुजरात अ संघाचा ३-० असा तर, तामिळनाडू संघाचा महाराष्ट्र अ संघाचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
६५ वर्षांवरील गटात महाराष्ट्र संघाने चंदीगढ संघावर ३-० असा विजय मिळवत आगेकूच केली. विजयी संघाकडून जयंत कुलकर्णी, उमेश कुंभोजकर, अविनाश जोशी यांनी अफलातून खेळी केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page