• पोदार प्रेप, कोल्हापूरचा अभिनव प्रयत्न
कोल्हापूर :
बालशिक्षणामध्ये पालकांची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पोदार प्रेप, कोल्हापूर येथे ‘Spend a Day with Your Child at School – Be a Child for a Day’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे पालकांना आपल्या मुलांच्या दैनंदिन शैक्षणिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
‘Kiducation’ या आधुनिक शैक्षणिक तत्त्वज्ञानावर आधारित हा उपक्रम NCF 2022 मधील पंचकोश संकल्पनेशी सुसंगत होता. अन्नमय (शारीरिक), प्राणमय (ऊर्जा), मनोमय (भावनिक), विज्ञानमय (बौद्धिक) आणि आनंदमय (आनंद व समाधान) या पाच स्तरांवर बालकांचा सर्वांगीण विकास कसा घडवला जातो, हे या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले.
उपक्रमादरम्यान पालकांनी सर्कल टाइम, गोष्टी सांगणे, संगीत व हालचाली, तसेच खेळावर आधारित विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या अनुभवातून मुलांमध्ये भाषा कौशल्य, संख्याज्ञान, सर्जनशीलता, सामाजिक कौशल्ये आणि आत्मविश्वास कसा विकसित होतो, याची प्रत्यक्ष जाणीव पालकांना झाली.
शिक्षण केवळ पुस्तकी मर्यादेत न राहता अनुभवाधारित, आनंददायी आणि जीवनोपयोगी कसे बनवले जाते, याचा सखोल अनुभव या उपक्रमातून पालकांना मिळाला. यामुळे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत झाली.
या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आपल्या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेशी अधिक जवळीक साधण्याची संधी त्यांनी मनापासून अनुभवली.
या यशस्वी उपक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा आंब्राळे तसेच मुख्याध्यापिका बिजल मेहता यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
अशा अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून पोदार प्रेप, कोल्हापूर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे.
——————————
‘Be a Child for a Day’ उपक्रमातून पालकांना बालशिक्षणाचा अनुभव
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
26.9
°
83 %
7.2kmh
7 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°

