Homeकला - क्रीडाआंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत केएसए कोल्हापूर संघाचा तृतीय क्रमांक

आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत केएसए कोल्हापूर संघाचा तृतीय क्रमांक

कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने लोणावळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा २० वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत के.एस.ए. कोल्हापूर संघाने रायगड संघावर २-० अशा गोलफरकाने विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.
पूर्वार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला पण गोलची नोंद करण्यात यश मिळाले नाही. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र उत्तरार्धात कोल्हापूर संघाने खेळावर पकड मिळवत आघाडी घेतली.
सामन्याच्या ७५व्या मिनिटाला ईशान तिवलेने मुस्तफा फरासच्या अचूक पासवर शानदार गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ८० व्या मिनिटाला स्वराज सावंतने मुदस्सर शेखच्या पासवर आणखी एक गोल करत आघाडी २-० अशी भक्कम केली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत कोल्हापूर संघाने विजय निश्चित केला.
कोल्हापूर संघाकडून अविराज पाटीलने उत्कृष्ट गोलरक्षण केले. बचाव फळीत रेहान मुजावर, मुदस्सर शेख आणि मुस्तफा फरास यांनी भक्कम खेळ केला. मधल्या फळीत प्रदीप शिंदे, मयूर सुतार आणि अथर्व पाटील यांनी उत्तम समन्वय राखत आघाडी फळीला प्रभावी साथ दिली.
संघाला प्रशिक्षक विश्वंभर मालेकर आणि रवींद्र शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
3.1kmh
11 %
Fri
29 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page