कोल्हापूर :
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेले दोन्ही सामने पूर्णपणे एकतर्फी झाले. पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने रंकाळा तालीम मंडळवर ४-० गोलने तर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ४-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह दोन्ही संघांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. दुपारच्या सत्रात पाटाकडील आणि सुभाषनगर संघादरम्यान सामना झाला. पहिली ३५ मिनिटे दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया वाया गेल्याने गोलफलक कोराच राहिला. पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत नबी खानने दिलेल्या पासवर अमीन खझीरने गोल नोंदवून संघाचे ३५व्या मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर जादावेळेत डी बाहेरून मारलेल्या फ्रीकिकवर अमीनने वैयक्तिक तसेच संघाचाही दुसरा गोल नोंदवून आघाडी वाढवली.
उत्तरार्धात ओमकार मोरेने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडव्दारा गोल नोंदवून आघाडी ३-० अशी भक्कम केली. ६७व्या मिनिटाला झालेल्या या गोल नंतर डी बाहेर मिळालेल्या फ्रीकिकवर ओमकार मोरेनू चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. अशाप्रकारे ७०व्या मिनिटास आघाडी ४-० अशी भक्कम झाली. सुभाषनगरकडून नितीन पोवार, आर्यन पंधारे, प्रविण सुतार, मोहम्मद अफताब, रोहन चव्हाण यांनी केलेल्या चढाया दिशाहिन फटके व समन्वयाअभावी वाया गेल्या. अखेर ४-०ची आघाडी राखतच पाटाकडीलने विजयावर शिक्कामोर्तब केले. दोन गोल नोंदवणारा अमीन खझीर सामनावीर ठरला.
‘शिवाजी’चा एकतर्फी विजय….
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळने रंकाळा तालीम मंडळवर ४-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला हर्ष जरगने संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर १६व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरेने गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. १९व्या मिनिटास ‘शिवाजी’कडून झालेल्या चढाईत रंकाळा तालीमच्या प्रतिक पाटीलकडून स्वयंगोल झाला. अशाप्रकारे ‘शिवाजी’ला आणखी एका गोलची आघाडी मिळाली. पूर्वार्धात मिळालेल्या ३-०च्या आघाडीनंतर उत्तरार्धात यश जांभळेने गोल नोंदवून ५४व्या मिनिटाला आघाडी ४-० अशी भक्कम केली.
रंकाळा तालीमकडून सोहम निकम, विवेक पाटील, ओमकार पाटील यांनी गोलसाठी केलेल्या चढायांना यश आले नाही. अखेर उर्वरित वेळेत ४-०ची आघाडी कायम राखून ‘शिवाजी’ने सामना जिंकला. हर्ष जरगला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
——————————
• खंडोबा – सम्राटनगर : दुपारी ४ वाजता
शिवाजी आणि पाटाकडीलचे एकतर्फी विजय
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28
°
C
28
°
28
°
83 %
1.5kmh
16 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°

