Homeशैक्षणिक - उद्योग ऑल-न्यू जियोफायनान्स अ‍ॅप लॉन्च

ऑल-न्यू जियोफायनान्स अ‍ॅप लॉन्च

• आता AI सांगणार पैशांची योग्य गुंतवणूक कुठे करावी
कोल्हापूर :
असंख्य फायनान्शियल अ‍ॅप्स, गुंतागुंतीचे पर्याय आणि सतत स्क्रोलिंगमुळे त्रस्त ग्राहकांसाठी जियो फाइनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेडने ‘ऑल-न्यू जियोफायनान्स अ‍ॅप’ लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे अ‍ॅप पारंपरिक पद्धतीने केवळ प्रॉडक्ट्सची यादी दाखवण्याऐवजी एका ‘इंटेलिजेंट डिजिटल मार्केटप्लेस’प्रमाणे काम करेल. Agentic AI आणि न्यूरल नेटवर्क्सच्या मदतीने हे अ‍ॅप वापरकर्त्यांना वैयक्तिकृत (पर्सनलाइज्ड) सल्ले देईल.
‘वन-साईज-फिट्स-ऑल’ संकल्पनेपेक्षा वेगळे असलेले हे अ‍ॅप १५ AI एजंट्स आणि सुमारे ७० निर्णय-निर्मिती इंजिन्सच्या आधारे वापरकर्त्यांच्या गरजा, पात्रता आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून पर्सनलाइज्ड पर्याय सुचवेल. म्हणजेच, तुम्ही होम लोन शोधत असाल, गुंतवणूक सुरू करायची असेल किंवा विमा कव्हर वाढवायचे असेल, तर तुमच्या प्रोफाइलला अनुरूप पर्याय थेट समोर येतील.
होम लोन, पर्सनल लोन, लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज, क्रेडिट कार्ड, विमा, UPI, फिक्स्ड डिपॉझिट, डिजिटल गोल्ड तसेच जियोब्लॅकरॉकचे म्युच्युअल फंड — हे सर्व पर्याय एकााच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. वेगवेगळ्या स्क्रीनवर जाण्याची गरज भासणार नाही. चॅट-बारमध्ये आपली गरज टाइप करताच संबंधित पर्याय त्वरित उपलब्ध होतील. शिवाय, प्रत्येक व्यवहारावर जिओपॉइंट्स मिळतील, जे विविध रिवॉर्ड्ससाठी रिडीम करता येतील.
लवकरच अ‍ॅपमध्ये ‘फायनान्शियल फिटनेस स्कोअर’ आणि ‘पर्सनल CFO फॉर भारत’सारखी फीचर्सही जोडली जाणार असून, खर्च, बचत, गुंतवणूक आणि विमा यांचे विश्लेषण करून सुधारणा सुचवल्या जातील.
लॉन्चप्रसंगी जियो फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ हितेश सेठिया यांनी सांगितले की, वित्तीय सेवा अधिक पारदर्शक, सोप्या आणि विश्वासार्ह बनवणे हा कंपनीचा उद्देश आहे, जेणेकरून प्रत्येक भारतीय आत्मविश्वासाने आपल्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण मिळवू शकेल.
‘Finsider’ कार्यक्रमाद्वारे कंपनी वापरकर्त्यांना अ‍ॅपच्या विकासात सहभागी करून घेणार असून, त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे अ‍ॅप अधिक सक्षम आणि वापरकर्ता-केंद्रित बनवण्यात येणार आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28 ° C
28 °
28 °
83 %
1.5kmh
16 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page