Homeकला - क्रीडास्कूल ऑफ इंजिनिअरिंग, फिजिओथेरपी संघ विजेते

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, फिजिओथेरपी संघ विजेते

• डी. वाय. पाटील विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने, तर महिला गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’ संघाने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यापीठाच्या प्रांगणात आधुनिक मॅटवर झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन केएमसी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ. अद्वैत राठोड, प्राचार्य रुधीर बारदस्कर, प्रशिक्षक डॉ. देवेंद्र बिरनाळे, डॉ. दीपक पाटील, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष गटात मेडिकल, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च या ६ संघांनी, तर महिला गटात ५ संघांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेच्य अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट संघाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघावर विजय मिळवला. तर महिला गटात डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी संघाने डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट संघावर मात करत विजेतेपद मिळवले.
विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.3 ° C
28.3 °
28.3 °
69 %
2.5kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page