Homeसामाजिकरानभाज्या म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीची गुरुकिल्ली : रक्षा शिंदे

रानभाज्या म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीची गुरुकिल्ली : रक्षा शिंदे

कोल्हापूर :
निसर्गाच्या कुशीत विनाविनासायास आणि नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या केवळ आवडीचा विषय नसून आरोग्याची उत्तम गुरुकिल्ली आहेत, असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे आयोजित तालुकास्तरीय रानभाजी व खाद्यपदार्थ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
ग्रामीण व आदिवासी भागांत पारंपरिक पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या विविध रानभाज्यांचे संवर्धन करणे, त्यांचे आहारातील महत्त्व आणि पोषणमूल्य जनमानसात रुजवण्याच्या उदेशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रक्षा शिंदे यांनी रानभाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या भरलेली जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय घटक आणि इतर आवश्यक पोषक मूल्यांची सविस्तर माहिती दिली. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या या रानभाज्यांची योग्य ओळख, त्यांची स्वच्छता आणि शास्त्रीय पद्धतीने केलेली हाताळणी कुटुंबाच्या संतुलित आहाराचा कणा बनू शकते, असे त्यांनी सांगितले.
हातकणंगले तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, तसेच आवश्यक नोंदणी व प्रमाणीकरणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेच्या गृहविज्ञान विभाग विषय विशेषज्ञ दिपाली मस्के यांनी केले.
या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी विश्वनाथ पाटील, एन. ए. मिसाळ, योगेश खाडे, बाळू गाडगे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी विभागाचे उप व सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे राजवर्धन सावंत भोसले, आत्माचे वसीम मुल्ला यांच्यासह शेतकरी गटांचे सदस्य व  महिला प्रतिनिधी उपस्थित होते. वसीम मुल्ला व दिपाली मस्के यांनी नियोजन केले. शिवानंद शिरढोणे यांनी आभार मानले.
         ———–
रानभाज्यांच्या विविध पाककृतींचे सादरीकरण….
यावेळी आयोजित पाककृती स्पर्धेत महिला गट व शेतकरी गटांनी उत्साहात सहभाग घेतला. स्थानिक रानभाज्यांचा वापर करून तयार केलेले वडे, थालीपीठ, पराठे, धिरडे, भजी, चटण्या, सूप आणि विविध पौष्टिक नाश्त्याचे पदार्थ सादर करण्यात आले. उत्कृष्ट पाककृती सादर करणाऱ्या विजेत्या स्पर्धकां

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.3 ° C
28.3 °
28.3 °
69 %
2.5kmh
0 %
Fri
31 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page