Homeइतरसंबंधित विभागांनी आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी : जिल्हाधिकारी

संबंधित विभागांनी आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर :
शारदीय नवरात्र महोत्सवाला लवकरच प्रारंभ होत आहे. या कालावधीत लाखोंच्या संख्येने भाविक कोल्हापूर शहरात दाखल होत असतात. या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची दक्षता संबंधित विभागाने घेऊन त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
आगामी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, मंदिर समितीच्या सचिव वर्षा साळोखे उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने ज्या अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे , त्यांना ओळखपत्र तसेच त्यांचा संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्न औषध प्रशासन विभागाने देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी तसेच महानगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग सुसज्ज करावा त्याचबरोबर रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत शिफ्ट वाईज कचरा उचलण्याचे नियोजन करावे त्याचबरोबर अग्निशमन दलाने फायर ऑडिट करावे, मंदिर समिती व पोलिसांनी भाविकांच्या गर्दीचे योग्य ते नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.
चार चाकी वाहने पार्किंगबाबत पोलीस विभागाने कडक धोरण अवलंबवावे तसेच उद्या मंगळवार पासून स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. भारुड म्हणाले तर मंदिर परिसराच्या आवारात अतिरिक्त बॅरेगेटिंग पोलीस विभागाला देण्यात यावीत अशी मागणी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली.
या नवरात्र महोत्सवात प्रामुख्याने अडथळा येतो तो दुचाकी – चार चाकी वाहनांच्या पार्किंगचा. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी पार्किंग कुठे – कुठे निर्माण करण्यात आली आहेत, याचे सादरीकरण पोलीस विभागातर्फे करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27.5 ° C
27.5 °
27.5 °
76 %
3.1kmh
33 %
Wed
29 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °
Sun
30 °

Most Popular

You cannot copy content of this page