Homeकला - क्रीडाओम पाटील यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात विनु मकंड स्पर्धेसाठी निवड

ओम पाटील यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात विनु मकंड स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट खेळाडू ओम डी. पाटील याची १९ वर्षाखालील विनु मकंड एकदिवशीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. ओम पाटील याला यावर्षी प्रथमच महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी लाभली आहे.
ही स्पर्धा एकदिवशीय साखळी पध्दतीची असुन या स्पर्धेतील साखळी सामने दि.८ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राजकोट येथे होणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ईलाईट अ ग्रुप मध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्रसह बडोदा, राजस्थान मणिपूर, हैद्राबाद, मध्यप्रदेश या राज्य संघाचा समावेश आहे. पहिला सामना ८ ऑक्टोबरला बडोदा संघा बरोबर दुसरा सामना १० ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेश, तिसरा सामना १२ ऑक्टोबरला राजस्थान बरोबर, चौथा सामना १४ ऑक्टोबर रोजी मणिपूर बरोबर व पांचवा सामाना १६ ऑक्टोबरला हैदाबाद बरोबर खेळविणेत येणार आहे. बाद फेरीे, उंपात्य व अंतीम सामने राजकोट येथे २० ते २७ ऑक्टोबर पर्यत होणार आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
77 %
3.4kmh
0 %
Tue
28 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page