• दरवर्षी २० लाख प्राण्यांपर्यंत पोहोचणार मदत
• उपचार, बचावकार्य, निवारा, अन्न आणि दीर्घकालीन देखभालीसाठी मिळणार सहकार्य
कोल्हापूर :
अनंत अंबानी यांनी देशभरातील प्राण्यांना मदत करण्यासाठी ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. वनताराच्या या मोहिमेशी देशभरातील ५० हून अधिक प्राणी कल्याण संस्था जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून दरवर्षी सुमारे २० लाख प्राण्यांना उपचार, बचावकार्य, निवारा, अन्न तसेच इतर आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाण्याची अपेक्षा आहे.
या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवर राहणारे कुत्रे आणि मांजरी, सोडून दिलेले किंवा जखमी प्राणी, तसेच गुरे, गाढवे आणि घोडे यांचाही समावेश असेल. गरजेनुसार प्राणी कल्याण संस्थांना रुग्णवाहिका, बचावकार्याची उपकरणे, उपचार व तपासणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री, निवारा तसेच प्रशिक्षण यांसारखे सहकार्य दिले जाणार आहे.
अनंत अंबानी म्हणाले, “दररोज अनेक लोक मर्यादित साधनसामग्री असूनही गरजू प्राण्यांची काळजी घेतात. ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’च्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून हे काम अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्यासाठी ‘एव्हरी लाइफ मॅटर्स’चा हाच खरा अर्थ आहे.”
वनतारा आणि या मोहिमेशी जोडलेल्या संस्थांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या अंतर्गत संस्था माहिती, अनुभव आणि संसाधने परस्परांमध्ये सामायिक करतील. त्यामुळे प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या गरजेनुसार अधिक प्रभावी सहकार्य उपलब्ध करून देता येणार आहे.
——————————
अनंत अंबानींची ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ मोहीम
Mumbai
scattered clouds
27.5
°
C
27.5
°
27.5
°
76 %
3.1kmh
33 %
Wed
29
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°
Sun
30
°

