Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय शाळा सुरक्षा धोरणांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय शाळा सुरक्षा धोरणांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

कोल्हापूर :
राष्ट्रीय शाळा सुरक्षा धोरण २०२५ मधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती प्रमिला राजे वैद्यकीय हॉस्पिटल कोल्हापूर व पंचायत समिती करवीर यांचे मार्फत विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात ज्युनियर आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख सौ. शिल्पा भोसले यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागताद्वारे झाली. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना निरनिराळ्या आजारांची लक्षणे आणि त्या अनुषंगाने होणारे दीर्घ आजार याची माहिती देऊन सर्वसामान्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी डॉ. प्रविण कांबळे, डॉ. शितल भिऊंगडे, सौ. सविता शिरहटी, कु. सुप्रिया कोळी यांनी विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे व डॉ. सी. बी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. या कार्यक्रमांमध्ये सायन्स विभाग प्रमुख प्रा मुकुंद नवले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. उत्तम तिजाईकर, प्रा. राजेश घाटगे, ऑफिस प्रबंधक सचिन धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
77 %
3.4kmh
0 %
Tue
28 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page