Homeराजकियपुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन

कोल्हापूर :
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कौस्तुभ गावडे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ घोडेराव म्हणाले की, पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाचही जिल्ह्यांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात आहे.
आगामी काळात पक्षाचे अध्यक्ष मा. खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करेल. महायुतीचा घटक पक्ष म्हणून युतीधर्माचे पालन करून शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी पक्षाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सिद्धार्थ घोडेराव, सदाशिव सांगावकर, अरुण जगधने, तानाजी मिसाळ, संग्राम सोनवणे, रोहन वाघमारे, अक्षय कांबळे, अथर्व नागवेकर, युवराज हिरवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.6 ° C
27.6 °
27.6 °
80 %
3.2kmh
0 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page