कोल्हापूर :
यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. ट्रिगर वन लागू केलेल्या तालुक्यांमधील पीक पंचनाम्याची कारवाई जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही पीक पंचनाम्याचे काम अखंडितपणे सुरू ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यांनी पन्हाळा तालुक्यातील मौजे दानेवाडी , जाफळे, केखले, माले, शहापूर अशा विविध ठिकाणी भेट देऊन भात, सोयाबीन, भाजीपाला, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची पाहणी केली.
या भेटींमध्ये जिल्हाधिकारी डॉ . राठोड यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठाम आहे. नुकसान भरपाई देण्याकरिता पंचनामे जलद गतीने करणे सुरू आहेत. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच सर्व संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय अधिकारी यांना चारा उपलब्ध बाबत नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती तापोळे यांच्यासह विविध कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.
——————————
जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी केली पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची पाहणी
Mumbai
clear sky
30
°
C
30
°
30
°
66 %
1.9kmh
6 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

