• ९४ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूपासून नवोदितांपर्यंत होणार सन्मान
कोल्हापूर :
कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात शतकभराची गौरवशाली परंपरा जपणारा प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सन १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या क्लबच्या फुटबॉल संघातून खेळलेल्या आजी-माजी खेळाडूंचा भव्य गौरव सोहळा बुधवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजता शिरोली जकात नाक्याजवळील द रामकृष्ण हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सुमारे २०० खेळाडूंना ‘प्रॅक्टिस गौरव पुरस्कार’ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रॅक्टिस फुटबॉल क्लब शतक महोत्सवी समितीचे अध्यक्ष नितीन सावंत व सेक्रेटरी रमेश मोरे यांनी ही माहिती दिली. यावेळी विजयराव जाधव, मारुती सावंत व अनिल महाजन उपस्थित होते.
ते म्हणाले की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक असून, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर महानगरपालिका परिवहन सभापती सत्यजित जाधव, नगरसेविका सौ. जयश्री चव्हाण, सौ. माधुरी नकाते आणि सौ. निलांबरी साळोखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शतक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला स्नेहमिलन आणि प्रकट मुलाखतीचे स्वरूप देण्यात आले आहे. गेल्या १०० वर्षांच्या कालखंडात अनेक तरुण फुटबॉलपटूंनी प्रतिकूल परिस्थितीत, सोयी-सुविधांचा अभाव असतानाही प्रचंड जिद्द, संघर्ष आणि क्लबवरील निष्ठेच्या जोरावर प्रॅक्टिसच्या संघासाठी योगदान दिले. या खेळाडूंनी केवळ मैदानावरच आपली कामगिरी बजावली नाही, तर पुढील पिढीलाही फुटबॉलची आवड आणि प्रॅक्टिस क्लबवरील निष्ठेची शिकवण दिली.
याच परंपरेचा वारसा पुढे नेत आज प्रॅक्टिस क्लबच्या संघातून चौथ्या पिढीतील खेळाडूही तितक्याच जिद्दीने आणि निष्ठेने खेळत आहेत. त्याचबरोबर भावी फुटबॉलपटूंची पिढी घडविण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे गेल्या शतकभरात क्लबच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे योगदान अमूल्य असल्याचे समितीने सांगितले.
क्लबच्या शतकभराच्या प्रवासात सहभागी झालेल्या नवोदित खेळाडूंपासून तब्बल ९४ वर्षे वयाच्या ज्येष्ठ खेळाडूपर्यंत सुमारे २०० आजी-माजी फुटबॉलपटूंचा त्यांच्या कुटुंबीयांच्या साक्षीने गौरव करण्यात येणार आहे. खेळाडूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित हा शतक महोत्सवी गौरव सोहळा प्रॅक्टिस क्लबच्या समृद्ध फुटबॉल परंपरेचा जागर करणारा ठरणार आहे.
——————————
प्रॅक्टिस क्लबच्या २०० आजी-माजी फुटबॉलपटूंचा बुधवारी गौरव सोहळा
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

