Homeराजकियगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर :
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील युवा नेते, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे माजी संचालक तथा लोकनियुक्त माजी सरपंच सत्यजीत सुरेशराव पाटील यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या राजकीय प्रवेशामुळे राहुल पाटील यांच्या गटाला खिंडार पडले.
करवीर तालुक्यातील कसबा बीडचे युवानेते आणि गोकुळ दूध संघाचे माजी संचालक तथा लोकनियुक्त माजी सरपंच सत्यजीत पाटील हे स्वर्गीय माजी आमदार पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक स्वर्गीय सुरेश पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे युवा नेतृत्व म्हणून परिसरात कार्यरत आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांनी सत्यजीत पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशाचे स्वागत केले. स्वर्गीय सुरेश पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सुरेश पाटील यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा पाया सत्यजीत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये असल्याचे आम. सतेज पाटील यांनी सांगितले. सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका असल्याचे सांगत आ. सतेज पाटील यांनी महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांवरही भाष्य केले.
सामान्य माणसाची सेवा करण्याची प्रेरणा काँग्रेसच्या विचारातून मिळते, असे सांगत आगामी काळात स्वर्गीय बोंद्रे दादा आणि स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्या मनातील कॉंग्रेस ही पुन्हा उभी करण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यासाठी सज्ज होवुया, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. गोकुळ टिकला पाहिजेत. म्हणून गोकुळची निवडणूक लढतोय ते साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय असे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
माझ्या कॉंग्रेस प्रवेशामुळे करवीर तालुक्याच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट निर्माण झाला असल्याचे सांगत काँग्रेसच्या विचारांशी जोडून घेत आगामी काळात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सत्यजीत पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना कोणत्याही वैयक्तिक अपेक्षेपेक्षा विचार आणि नेतृत्वाला महत्त्व दिल्याचे सत्यजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी एम. आर. पाटील आणि राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, उदय पाटील सडोलीकर, करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, नगरसेवक विनायक फाळके, राहुल माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, शशिकांत खोत, उदय पाटील, बीडचे सरपंच संतोष मोरे, डॉ. के. एन. पाटील, सुशिल देसाई, गुंडू पाटील, शिवाजी गावडे, हिदायत मुल्ला, श्रीनिवास पाटील, रवींद्र पाटील, प्रताप नाईक, सागर पाटील, भरत रसाळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
81 %
2.5kmh
42 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
31 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page