Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे डॉ. घोलप यांना ‘उत्कृष्ट अभियंता...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे डॉ. घोलप यांना ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’

कोल्हापूर :
इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर विभागातर्फे आयोजित ५९व्या अभियंता दिन सोहळ्यात डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. बाबासाहेब घोलप यांना ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान तसेच शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे १५ सप्टेंबर रोजी झालेल्या या सोहळ्यात डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार एस. गुप्ता यांच्या हस्ते आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. घोलप यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अभियंत्यांची भूमिका, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील समन्वय तसेच नवोपक्रमाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कुलगुरू डॉ. गुप्ता यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवा पिढीने देशात राहून संशोधन, नवोपक्रम आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशातील संधींसोबतच भारतातील उपलब्ध शैक्षणिक व संशोधनाच्या संधींचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कोल्हापूर लोकल सेंटरचे अध्यक्ष अजय देशपांडे, मानद सचिव योगेश चिमटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब घोलप यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. (डॉ.) अनिलकुमार गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र ए. खोत यांनी अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.3 ° C
28.3 °
28.3 °
81 %
2.4kmh
67 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page