कोल्हापूर :
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चला शाळेत जाऊया अभियान उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणीबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक घुगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई, महादेव वांडरे यांच्यासह तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जिल्ह्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने चला शाळेत जाऊया अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देण्यात याव्यात. शाळांना भेट देत असताना शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची प्रगती, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, शुध्द पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, वर्गखोल्यांची स्थिती, शाळा व परिसरातील स्वच्छता, क्रीडागंण व संरक्षक भिंत, वीज, आवश्यक साहित्य, विद्यार्थ्यांचे गणवेश, लॅब, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, किचन शेड, पोषण आहाराची गुणवत्ता व वेळेवर वितरण आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी. त्याचबरोबर शाळांमधील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत आहेत की नाही, याची खात्री करावी आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेबाबत केलेल्या उपाययोजनांची पाहणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चला शाळेत जाऊया अभियानाबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवानही त्यांनी केले.
——————————
जिल्ह्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी डॉ. राठोड
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.9
°
C
28.9
°
28.9
°
78 %
3.5kmh
16 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°

