• ‘लेटेस्ट’चा विसर्जन मिरवणुकीत ‘गोवा मुक्ती संग्राम’चा चित्ररथ
कोल्हापूर :
मंडळाच्या नावातच ‘लेटेस्ट’ असलेल्या मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळने गणेशोत्सवातील सजीव देखावे आणि दरवर्षी लक्षवेधी विसर्जन मिरवणुकीची परंपरा कायम राखली आहे. यंदा गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास आणि महाराष्ट्राचे योगदान चित्ररथाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज पारतंत्र्याविरुद्ध गोमंतभूमीने पुकारलेल्या गोवा मुक्तिसंग्रामाला महाराष्ट्राने सत्याग्रह, क्रांती आणि बलिदानाची धार दिली. मराठी मातीतील असंख्य सत्याग्रहींनी छातीवर गोळ्या झेलूनही तिरंगा उंच ठेवला आणि गोवा मुक्तीची ज्योत अखंड तेवत ठेवली. याच धगधगत्या इतिहासाची आठवण करून देणारा भव्य ‘महाराष्ट्राचे योगदान, बलिदान आणि गोवा मुक्तिसंग्राम’ हा चित्ररथ यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती लेटेस्ट तरुण मंडळचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सवात गोवा येथील मर्दनगड हा सजीव देखावा सादर केला आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीत ‘गोवा मुक्ती संग्राम’चा चित्ररथ सहभागी होणार आहे. मंडळाच्या वतीने आयोजित श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २५) सकाळी १० वाजता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील तसेच गोवा मुक्तिसंग्रामाचे प्रमुख अभ्यासक व इतिहासतज्ज्ञ प्रा. प्रांजल साखरदांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चित्ररथातून साकारला जाणार इतिहास….
गोवा मुक्तिसंग्रामावरील हा भव्य चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची आठवण करून देणारा असेल. त्यावर मुक्तिसंग्रामातील शिलेदारांच्या संघर्षाचा सजीव देखावा साकारण्यात येणार आहे. त्या काळातील वेशभूषा आणि वातावरणाची अनुभूती देण्यासाठी सुमारे ३५० कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीतील १२५ तिरंगी झेंडे घेऊन सहभागी होणारे ‘तिरंगी पथक’ हे विशेष आकर्षण ठरणार आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
मिरवणुकीत गोलीवडे (ता. पन्हाळा) येथील १२० जणांचे ढोल-झांजपथक सहभागी होणार आहे. त्याचबरोबर भुये (ता. करवीर) येथील पारंपरिक धनगर ढोलपथकही मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रविण फडतरे, सचिव अजित पोवार, अभिजीत करपे, इंद्रजीत पोवार, मिलिंद हिर्लोस्कर, पंडित पाटील, ऋतुराज म्हामुलकर, संदीप शेलार, सार्थक यादव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————
बलिदानाची गाथा, तिरंग्याची शान; गोवा मुक्तिसंग्रामाचा चित्ररथ ठरणार आकर्षण
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
80 %
1.5kmh
97 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

