कोल्हापूर :
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर रोजी ‘स्वस्थ भारत : प्रतिजैविक प्रतिकारशक्तीशी लढा’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी आर.सी.एस.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. शिल्पा पुट्टा यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी प्रतिजैविकांचा योग्य वापर, प्रतिजैविक प्रतिकारशक्तीची कारणे, त्याचे दुष्परिणाम तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. ए. आर. पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राध्यापक वाय. के. पुजारी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या व्याख्यानामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रतिजैविकांच्या जबाबदार वापराबाबत जागरूकता निर्माण होऊन आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
——————————
न्यू वूमन्स कॉलेजमध्ये प्रतिजैविक प्रतिकारशक्तीवर व्याख्यान संपन्न
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
80 %
1.5kmh
97 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

