Homeसण - उत्सवव्हॅलोनिया सोसायटीत गणेशोत्सव जल्लोषात

व्हॅलोनिया सोसायटीत गणेशोत्सव जल्लोषात

• महिला सदस्यांच्या ढोलपथकाची परंपरा
कोल्हापूर :
बावधन येथील व्हॅलोनिया सोसायटीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणरायाच्या आगमनावेळी सोसायटीतील सदस्यांच्या ढोलपथकाकडून वाजत-गाजत बाप्पांचे स्वागत करण्याची परंपरा येथे जपली जात आहे. विशेष म्हणजे पाच ढोल आणि तीन ताशांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जवळपास १०० सदस्यांच्या विशाल ढोलपथकापर्यंत पोहोचला आहे.
या ढोलपथकाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा लक्षणीय सहभाग. दैनंदिन कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत महिला उत्स्फूर्तपणे ढोलपथकाची सेवा बजावत आहेत. याचबरोबर सोसायटीतील ज्येष्ठ महिलांचे स्वतंत्र लेझीम पथकही गणेशोत्सवाची रंगत वाढवत आहे. यंदा महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून ढोल वादन करत गणरायाचे स्वागत केले. त्यांच्या उत्साहाचे आणि कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ढोलपथकाची तयारी आणि प्रशिक्षण गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीपासून सुरू केले जाते. प्रशांत येवले, अभिषेक जगताप, यतीन शाह आदींच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांना ढोल-ताशांचे प्रशिक्षण दिले जाते. नियमित सरावातून पथकातील सदस्यांनी वादनात चांगले प्रभुत्व मिळविले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सोसायटीमध्ये दररोज विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, ज्येष्ठ महिलांकडून गणेशकथा, आरती यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमधून उत्सवाला भक्तिमय वातावरण प्राप्त होते. एकजुटीने साजरा होणारा गणेशोत्सव आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ही व्हॅलोनिया सोसायटीची खास ओळख बनली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
3 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page