कोल्हापूर :
वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पृथा वर्टीकर, ईशान खांडेकर, कुशल चोपडा, इक्षिका उमाटे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील येथील हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम लढतीत पुण्याच्या पृथा वर्टीकर हिने नाशिकच्या स्वरा करमरकर हिचा 5-11, 4-11, 11-8, 11-7, 11-1, 11-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पृथा ही चित्कारा विद्यापीठात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
पुरुष गटात अंतिम लढतीत नाशिकच्या कुशल चोपडाने कोल्हापूरच्या अनिश सोनटक्केचा 11-9, 9-11, 11-8, 11-7, 11-9 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. कुशल हा चंदीगढ विद्यापीठात बीबीए शिकत असून नाशिक येथे प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात नागपूरच्या इक्षिका उमाटे हिने नाशिकच्या स्वरा करमरकर चा 6-11, 11-7, 11-8, 11-5, 11-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. इक्षिका एनआयओएस पुणे येथे बारावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून अपेक्स स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक उपेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

19 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात पुण्याच्या ईशान खांडेकर याने आपला शहर सहकारी प्रणव घोलकरचा 11-13, 10-12, 11-5, 11-7, 11-8, 11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ईशान हा सप महाविद्यालयात शिकत असून पीवायसी टॉस अकादमीत प्रशिक्षक दीपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
——————————
टेबल टेनिस स्पर्धेत पृथा वर्टीकर, ईशान खांडेकर, कुशल चोपडा, इक्षिका उमाटे यांना विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
4.1kmh
99 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°