कोल्हापूर :
गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच इतर कार्यक्रमांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters गॅसचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बंदी घातली आहे.
जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. या काळात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. काही मंडळांकडून मिरवणुकांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या वापरामुळे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मानवी श्वसन संस्था, हृदय, कान व डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याबरोबरच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १४ ते २५ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुका तसेच इतर कार्यक्रमांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters गॅसचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.
—————————— ————————-

——————————