• तळसंदे येथील शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा उपक्रम
कोल्हापूर :
ज्यांना शारीरिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये येणे शक्य होत नाही, अशा गरजू रुग्णांच्या गावापर्यंत शिबिराच्या माध्यमातून फिजिओथेरपी उपचार देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम तळसंदे येथील शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने परिसरात राबविण्यात येणार असल्याची माहिती डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. अमृतकुंवर रायजादे यांनी दिली.
तळसंदे येथील शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये आयोजित चर्चासत्रात डॉ. रायजादे बोलत होत्या.
यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर, शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी डॉ. डॉ. टी. ए. मोरे, हॉस्पिटलचे फिजिओथेरपी प्रमुख डॉ. जावेद सागर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. रायजादे म्हणाल्या की, कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी, फ्रॅक्चर, शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन, लहान मुलांवरील फिजिओथेरपी उपचार, खेळाडूंना झालेल्या दुखापतींवर उपचार आणि पुन्हा खेळण्यासाठी पुनर्वसन, हृदय व श्वसनाशी संबंधित आजार, आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी गर्भधारणेपूर्वी, गर्भावस्थेत आणि प्रसूतीनंतरचे व्यायाम व उपचार, कॅन्सरच्या उपचारांनंतर येणारा थकवा, अशक्तपणा, हालचालींच्या समस्या आणि पुनर्वसनासाठी, पक्षाघात, पार्किन्सन्स, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित आजारांमध्ये हालचाल आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी या फिजिओथेरपी उपचारांचा उपयोग केला जातो. फिजिओथेरपी ही फक्त दुखणे कमी करण्यासाठी नसून, रुग्णाची हालचाल, ताकद, शारीरिक क्षमता आणि स्वावलंबन पुन्हा मिळवून देणारी उपचार पद्धती असल्याचे डॉ. रायजादे यांनी यावेळी स्पष्ट केले.
तळसंदे येथील शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. वृद्ध व्यक्ती, हालचालींमध्ये अडचण असलेले रुग्ण तसेच दीर्घकालीन आजारांमुळे नियमित हॉस्पिटलमध्ये येणे कठीण असलेल्या रुग्णांच्या गावामध्ये शिबिरे आयोजित करून त्यांना फिजिओथेरपी उपचार देण्याचा उपक्रम हॉस्पिटलच्यावतीने सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरी थोरात आणि विभावरी वळंजू यांनी केले तर आभार डॉ. श्रुतिका शिंदे यांनी मानले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रकुलपती व विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांचे मार्गदर्शन उपकुलसचिव संजय जाधव, प्रशासन अधिकारी जयदीप पाटील यांचे सहकार्य लाभले.
रुग्णांच्या गावातच मिळणार फिजिओथेरपी उपचार
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30
°
C
30
°
29.9
°
74 %
8.2kmh
98 %
Sun
30
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
29
°

