HomeUncategorizedडी. वाय. पाटील विद्यापीठात डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात

डी. वाय. पाटील विद्यापीठात डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात

• स्कूल ऑफ डिझाइनच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
डिझाईन हे भविष्यातील महत्त्वाचे आणि व्यापक करिअर क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या अमर्याद संधी असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ संधीचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ डिझाइनच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि इंडक्शन प्रोग्राम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मध्यप्रदेश सरकारचे पर्यटन विषयक तांत्रिक सल्लागार आणि ट्रायबल आर्टचे प्रणेते, ज्येष्ठ कलाकार गुरुदत्त काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यापीठाचे डॉ. ए. के. गुप्ता, गुरुदत्त काटे, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कला, संस्कृती, तंत्रज्ञान, प्रयोगशीलता आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालत आयोजित करण्यात आलेल्या या आठवडाभराच्या इंडक्शन प्रोग्रामध्ये विद्यार्थ्यांच्या डिझाईन प्रवासाला सर्जनशील आणि प्रेरणादायी सुरुवात झाली आहे.
यावेळी डॉ. गुप्ता यांनी डिझाईन क्षेत्रातील वाढत्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या विविध शक्यतांवर प्रकाश टाकला. पश्चिम महाराष्ट्रात स्कूल ऑफ डिझाईन सुरू करण्यामागील विद्यापीठाची दूरदृष्टी स्पष्ट करताना, डिझाईन हे भविष्यातील महत्त्वाचे आणि व्यापक करिअर क्षेत्र असल्याचे त्यांनी सांगितले. कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे गुरुदत्त काटे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक कला, आदिवासी कला, हस्तकला आणि वस्त्रकलेच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली. पारंपरिक कलांचा आधुनिक टेक्सटाईल, फॅशन आणि उत्पादन डिझाईनमध्ये कसा उपयोग करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक प्रिंटिंग व पारंपरिक कलांवर आधारित प्रत्यक्ष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः ब्लॉक प्रिंटिंगचा अनुभव घेत विविध डिझाईन्स विकसित केली.
विभागप्रमुख नचिकेत बाविस्कर आणि नितीन वारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शारोन काळे, प्रा. श्रावणी गिरी गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
30.1 ° C
30.1 °
30.1 °
58 %
1.1kmh
100 %
Fri
31 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page