Homeसण - उत्सवकोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना

कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना

कोल्हापूर :
कोल्हापूर शहर व परिसरातील गणेशोत्सव साजरा करणारी सर्व लहान-मोठी तरुण मंडळे, जुन्या तालीम संस्था यांनी एकत्र येऊन, कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीची स्थापना केली आहे, अशी माहिती गजानन यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महासमितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गजानन यादव म्हणाले की, गेले दोन महिने शहर व परिसरात त्या त्या भागातील प्रमुख तालीम-संस्था व मंडळांच्या बैठका घेऊन विस्तृत चर्चा करून सर्वानुमते या महासमितीची स्थापना केली आहे. सोमवारी (दि.१७) सायंकाळी ४:३० वाजता शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सर्व मंडळांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी कोल्हापूर गणेशोत्सव महासमितीचे उदघाटन करण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरची संस्कृती जपत उत्सव साजरा करण्यासाठी मंडळांना संघटित मदत करण्यासाठी ही महासमिती कार्यरत असणार आहे. वर्षभर महासमितीच्यावतीने समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. शहरातील विविध भागातील मंडळांच्या प्रतिनिधींची एक कार्यकारणी नियुक्त करण्यात आले असून या कार्यकारणीच्या निमंत्रणाखाली विभागीय समिती स्थापना करण्यात येणार आहे.
    —————–
महासमितीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे-
कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीच्या अध्यक्षपदी गजानन यादव यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष- शिवाजीराव जाधव, सहकार्याध्यक्ष- रामदास काटकर, उपाध्यक्ष- राजेंद्र ठोंबरे, अजित चव्हाण व प्रसाद वळंजू सेक्रेटरी- पद्माकर कापसे, जॉ. सेक्रेटरी- किरण अतिग्रे, खजानिस- सुशील भांदिगरे, सहखजानिस- सुदर्शन सावंत तर सदस्य म्हणून शिवाजी मोरे,आबाजी जगदाळे, राजू जाधव (एनडी),संजयकाका जाधव, अशोक पोवार, राकेश पोवार, रमेश मोरे, अमित चव्हाण, दिलीप माने,अनिल अष्टेकर, बाळासो पाटील, कपिल चव्हाण, अजित सासणे, युवराज पोवार, सारंग कारंडे, शशिकांत नलवडे, शशिकांत बिडकर, निलेश पिसाळ, विघ्नेश आरते, रोहित खराडे, अक्षय खोत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
74 %
5.1kmh
98 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page