Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये ‘युवान’ अभियानाचे उत्साहात

विवेकानंद कॉलेजमध्ये ‘युवान’ अभियानाचे उत्साहात

कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवान अभियान’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. युवकांमधील ऊर्जा, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीला सकारात्मक दिशा देण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिजीत कुलकर्णी व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी केले. डॉ. राजश्री पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रवीण बागडे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. संपदा ठिकपुर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे तसेच सदानंद दुर्गुळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक कार्याची नवी दिशा स्वीकारण्याचा संकल्प केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
74 %
5.1kmh
98 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page