Homeइतरसभासदांच्या सुरक्षिततेला दत्त कारखान्याचे प्राधान्य

सभासदांच्या सुरक्षिततेला दत्त कारखान्याचे प्राधान्य

• ११० वारसांना सव्वा कोटींची विमा मदत
कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघात विमा पॉलिसी राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत आजपर्यंत अपघातग्रस्त व मृत सभासदांच्या ११० वारसांना एकूण १ कोटी १९ लाख ९६ हजार ५७१ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कारखान्याने न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड, इचलकरंजी यांच्या माध्यमातून सर्व सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीनुसार अपघाती मृत्यू, सर्व अवयव निकामी होणे किंवा कायमस्वरूपी दोन डोळे अथवा दोन हात-पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक हात-पाय निकामी झाल्यास ५० हजार रुपये विमा लाभ दिला जातो.
याच पॉलिसीअंतर्गत महापुरात अपघाती मृत्यू झालेल्या इकबाल बाबासो बैरागदार (अकिवाट), अरुण बंडू सावंत (राजापूर), बाबासो कोळी (तिळवणी), शिवगोंडा भीमा मगदूम (खरोसे, दत्तवाड), बळवंत आनंत कुलकर्णी (इंगळी), बाबासो बाबाजी कोळेकर (कारदगा) यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच महादेव पिरगोंडा केरीपाळे (घरणगुत्ती) यांना मोटारसायकल अपघातामुळे ३४३ दिवस कामावर अनुपस्थित राहावे लागल्याने १ लाख ४६ हजार ५७१ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
याशिवाय, अरुण बंडू सावंत यांच्या कुटुंबीयांना दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेकडून २ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संबंधित लाभार्थ्यांना एकूण १३ लाख ९६ हजार ५७१ रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
धनादेश वितरण कार्यक्रम दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, ज्येष्ठ संचालक इंद्रजीत पाटील, बाळासाहेब पाटील (हलसवडे), प्रमोद पाटील, शेखर पाटील, रणजीत कदम यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, सेक्रेटरी अशोक शिंदे, फायनान्स मॅनेजर संजय भोसले, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, तसेच दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर शहापुरे व सेक्रेटरी महेश परीट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील व इतर संचालक उपस्थित होते.
या विमा दाव्यांच्या प्रक्रियेसाठी कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे, पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उपमहाप्रबंधक एच. बी. अरुण कुमार, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ, मृणाल उरुणकर, राधिका पाटील, ब्रँच मॅनेजर रोहन खाडीलकर, असिस्टंट मॅनेजर शितल मोहिते, प्रशासकीय अधिकारी श्रीराज सिद्धार्थ, मॅनेजर वनिता कुंभार, सहाय्यक शुभम कदम व नितीन पाटील यांनी विशेष सहकार्य केले. तसेच कारखान्याच्या शेअर विभागातील परवेज मेस्त्री आणि अमृता चौगुले (खोत) यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page