HomeUncategorizedघोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
व्हिएतनाममधील टॉन डक थँग विद्यापीठ, हो ची मिन्ह सिटी येथे दि. १२ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित प्रगत पदार्थ व शाश्वत विकास विषयक आंतरराष्ट्रीय परिषद (आयकॅमएसडी२०२६) मध्ये तोंडी संशोधन सादरीकरण विभागात डॉ. सचिन कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत हा सन्मान टॉन डक थँग विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. कांबळे यांनी झिंक ऑक्साईड आणि मँगनीज ऑक्साईड यांच्या संमिश्राचा वापर करून ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक अतिजलद विद्युतभार साठवणूक यंत्र (सुपर कॅपेसिटर) विकसित करण्याचे संशोधन सादर केले. ऊर्जा साठवणूक, अक्षय ऊर्जा आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या संशोधनात आहे.
डॉ. सचिन कांबळे यांचे हे यश केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या संशोधनपरंपरेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. तसेच विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या यशातून निश्चितच मिळणार आहे.
या संशोधन कार्यासाठी घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकचे डॉ. शेषनाथ भोसले, डॉ. कपिल राजहंस, डॉ. राजू मगदूम, डॉ. देवानंद कांबळे आणि इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
30.3 ° C
30.3 °
30.3 °
61 %
5.6kmh
89 %
Fri
30 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
30 °

Most Popular

You cannot copy content of this page