कोल्हापूर :
भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून फलटण-वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि शाही पाकसंस्कृती जतन करणारे “फलटण-वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद” हे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक पाककलेचा अनोखा संगम असलेल्या या पुस्तकाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले की, या पुस्तकामध्ये माझं माहेर असलेल्या नाईक-निंबाळकर घराण्यातील एकत्र कुटुंबपद्धती, शिस्त, संस्कार, माणुसकी, एकोपा आणि परंपरांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. त्याचबरोबर घराण्याच्या पिढ्यान् पिढ्या जपलेल्या शाही शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती साहित्य, कृती आणि आकर्षक छायाचित्रांसह सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक इतिहासप्रेमीं सोबतच पाककलाप्रेमी आणि दर्दी खवय्यांसाठीही विशेष आकर्षण ठरणार आहे.
पुस्तकामध्ये सौ. अरुंधती महाडिक यांचे वडील हैबतराव नाईक-निंबाळकर, आई सौ. विजयश्री नाईक-निंबाळकर तसेच संपूर्ण नाईक-निंबाळकर परिवाराची जीवनशैली, वाठार येथील भव्य वाडे, घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे, मराठा साम्राज्यातील योगदान आणि ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ पाककृतींचा संग्रह नसून ऐतिहासिक दस्तावेज म्हणूनही महत्त्वाचे ठरते.
सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले की, माहेरी गेल्यानंतर आई व कुटुंबातील ज्येष्ठ महिलांशी पारंपरिक स्वयंपाकाविषयी नेहमी चर्चा होत असे. या पाकपरंपरेचे जतन व्हावे, नव्या पिढीपर्यंत या चवीचा आणि संस्कृतीचा वारसा पोहोचावा, या उद्देशाने त्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ महिलांकडून प्रत्येक पाककृतीची माहिती संकलित करून हे पुस्तक साकारले.
या पुस्तकासाठी इतिहास लेखन शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम (राजू) राऊत यांनी केले असून, इतिहास अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी वाठारकर नाईक-निंबाळकर घराण्याचे इतिहासातील स्थान आणि वाठार गावाच्या भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्वावर लेखन केले आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
पुस्तकाची रचना, सजावट आणि छायाचित्रणाची जबाबदारी सुचित्र ॲडव्हर्टायझिंगचे विशाल कुमठेकर यांनी पार पाडली असून, अक्षरदालनचे अमेय जोशी यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
हे पुस्तक कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील अक्षरदालन (मो. ७७९६६४६४२३) तसेच छत्रपती ताराराणी चौकाजवळील भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात (मो. ९६७३८१९२९२) विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, विशाल कुमठेकर आणि अमेय जोशी उपस्थित होते.
——————————
नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास आणि शाही पाकपरंपरा उलगडणारे पुस्तक प्रकाशित
Mumbai
overcast clouds
27.7
°
C
27.7
°
27.7
°
87 %
11.6kmh
100 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

