Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित ‘फार्मासी हॅमिलुअस’ येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख रुपयाचे पॅकेज प्राप्त झाले आहे. फार्मसी विभागातील आतापर्यंतचे हे सर्वोच्च पॅकेज आहे.
या यशावर भाष्य करताना संजय घोडावत विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले की, हा टप्पा म्हणजे विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे व्यवहारिक शिक्षण, त्यानुसार रोजगाराभिमुख कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यावर भर, प्लेसमेंट विभागाचे विविध उपक्रम, त्याद्वारे जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.
घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, टीपीओ संचालक डॉ. नितीन पुजारी आणि प्राध्यापक वर्गाने पराग भोपाळेचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
29.9 °
74 %
5.1kmh
83 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page