कोल्हापूर :
केंद्रीय गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा हे १९ व २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या आणि पोलीस ग्राऊंडवरील सभेच्या तयारीचा आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी घेतला.
यानिमित्त त्यांनी सभास्थळाची पाहणी केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विभागनिहाय नियोजन बैठकीत सहभाग घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. पोलीस ग्राऊंड येथे आयोजित सभेच्या अनुषंगाने चंद्रकांतदादा पाटील यांनी मंडप उभारणी, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, व्हीआयपी रूट, सुरक्षा नियोजन तसेच अन्य आवश्यक सुविधांची सविस्तर पाहणी केली. सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने सर्व व्यवस्था शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
यावेळी महापौर रूपाराणी निकम, भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, मुरलीधर जाधव, सुजितभाऊ चव्हाण, प्रसाद चव्हाण, तानाजी पाटील, डॉ. राजवर्धन, अमर साठे, आप्पा लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, ओएसडी बी. बी. यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत चंद्रकांतदादा पाटील यांनी सहभाग घेतला. या बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर हे ऑनलाईन लिंकद्वारे उपस्थित होते. तसेच नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, पोलीस अधीक्षक निलोत्पल जिल्हाधिकारी राठोड, महापौर रूपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, सुजित चव्हाण, भैया माने, आदिल फारस, सुमित कदम यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, अग्निशमन, स्वच्छता, आपत्कालीन यंत्रणा, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या सुविधांबाबत करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखून नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.
——————————
अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावा
Mumbai
moderate rain
27.9
°
C
27.9
°
27.9
°
82 %
5.4kmh
98 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
29
°

