Homeशैक्षणिक - उद्योग जागतिक पेटंट क्रमवारीत जिओची टॉप-20मध्ये झेप

जागतिक पेटंट क्रमवारीत जिओची टॉप-20मध्ये झेप

कोल्हापूर :
जिओ प्लॅटफॉर्म्सने जागतिक पेटंट क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या ताज्या पेटंट को-ऑपरेशन ट्रीटी क्रमवारीत जिओ प्लॅटफॉर्म्सने जागतिक टॉप-20 मध्ये स्थान मिळवले आहे. 2025 च्या यादीच्या तुलनेत कंपनीने तब्बल 320 स्थानांची झेप घेत 20वे स्थान पटकावले आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची तंत्रज्ञान शाखा आहे. या नव्या क्रमवारीमुळे जिओ ही जागतिक टॉप-20 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय तंत्रज्ञान नवोन्मेषक कंपनी ठरली आहे. जिओ आता हुआवेई, सॅमसंग, क्वालकॉम, एलजी, पॅनासोनिक, नोकिया, गूगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या श्रेणीत सामील झाली आहे.
जिओच्या पेटंट अर्जांचा केंद्रबिंदू पुढील पिढीतील डिजिटल तंत्रज्ञान आहे. यामध्ये 5G, 5G ॲडव्हान्स्ड, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), AI-नेटिव्ह नेटवर्क्स, क्लाउड-नेटिव्ह प्लॅटफॉर्म्स, इंटेलिजंट ऑटोमेशन, रेडिओ ॲक्सेस, कोअर नेटवर्क सॉफ्टवेअर, एज इंटेलिजन्स, फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस, नेटवर्क स्लायसिंग आणि डिजिटल सेवा पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
या यशाबद्दल जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले की, WIPO PCT क्रमवारीत जिओ प्लॅटफॉर्म्सचा जागतिक टॉप-20 मध्ये समावेश होणे, डीप-टेक कंपनी बनण्याच्या दिशेने आम्ही अनेक वर्षे केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. जिओमध्ये विविध प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रांत होत असलेल्या उल्लेखनीय नवकल्पनांचा हा पुरावा असून, आगामी काळात ही गती आणखी वाढेल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
70 %
2.6kmh
52 %
Tue
30 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
32 °
Sat
30 °

Most Popular

You cannot copy content of this page