Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळच्यावतीने डॉ. योगेश गोडबोले यांचा सत्कार

गोकुळच्यावतीने डॉ. योगेश गोडबोले यांचा सत्कार

कोल्हापूर :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी झालेली निवड ही गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांनी केले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात प्राधिकृत अधिकारी मंडळाच्या बैठकीदरम्यान डॉ. गोडबोले यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय सुद्रिक यांच्या हस्ते डॉ. गोडबोले यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संजयकुमार सुद्रिक म्हणाले की, हा सन्मान केवळ डॉ. गोडबोले यांचा नसून संपूर्ण गोकुळ परिवाराचा आहे. दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील त्यांचे ज्ञान, अनुभव, नेतृत्व आणि संघटित कामकाजाची पद्धत यामुळेच हा मान योग्य व्यक्तीला मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे गोकुळचे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व अधिक भक्कम होईल आणि दुग्ध क्षेत्रातील विविध विषयांवर गोकुळची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल.
सत्काराला उत्तर देताना कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले, इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोकुळ परिवाराने व्यक्त केलेल्या सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून गोकुळच्या दूध उत्पादक शेतकरी, संस्था सभासद, प्रशासकीय अधिकारी मंडळ, माजी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. भविष्यातही दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी तसेच गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.
याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, प्रकाश आडनाईक, प्रताप पडवळ, डॉ, व्ही. डी. पाटील, डॉ. एम. पी. पाटील, एस. आर. पाटील, भरत मोळे संघाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
81 %
7kmh
78 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page