HomeUncategorizedभाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर :
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला. शुक्रवारी (दि.१२) वाढदिवसानिमित्त पांजरपोळ संस्थेतील गुरांना फळे, धान्य, चार्‍याचे वाटप, गरजूंना अन्न वाटप, एचआयव्हीग्रस्तांना खाऊ वाटप, रेल्वे स्टेशनवरील फिरस्त्यांना छत्र्यांचे वाटप आणि नशामुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत दुधवाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
कोल्हापुरातील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी वाढदिवसानिमित्त दिवसभरात शिये येथील करुणालय संस्थेतील एचआयव्हीग्रस्त मुलांना खाऊचे वाटप केले. पांजरपोळ संस्थेतील जनावरांना एक ट्रॉली फळे, भाजी, दोन ट्रॉली चारा दिला. सीपीआर चौकात कोल्हापुरी थाळीच्या माध्यमातून अन्नदान, फिरस्त्यांना छत्र्या वाटप आणि नशामुक्त भारत अभियानाला बळ देण्यासाठी मिरजकर तिकटी येथे दूध वाटप उपक्रम राबवण्यात आला. या सर्वच उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिकप्रेमी तसेच धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपा युवा मोर्चाच्यावतीने दिवसभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील शिये येथील भाजपा पदाधिकार्‍यांच्यावतीने दिव्यांगांसाठी ६ व्हिलचेअर आणि ६ स्टीक आणि अन्य साहित्य देण्यात आले. भागिरथी महिला संस्थेच्या कार्यालयात हे साहित्य प्रदान करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना सदस्य मारुती बुवा, करवीर पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, दत्तात्रय चौगुले, अनिल जाधव, बाजीराव सातपुते, अमर उरुणकर, शिवानी पाटील, संगीता खाडे, पुष्पा पवार, अर्पिता जाधव यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील शिये येथील एचआयव्हीग्रस्त मुलांच्या करुणालय या संस्थेत कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस साजरा झाला. भाजपा पदाधिकार्‍यांनी या संस्थेतील मुलांना खाऊचे वाटप केले. दुपारी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी उद्यमनगर येथील पांजरपोळ संस्थेतील जनावरांना दोन ट्रॉली चारा देण्यात आला. तसेच किरण शिराळे फौंडेशन आणि श्रीराम युवा प्रतिष्ठानच्यावतीने १०० कलिंगडे, २५ डझन अननस, ३० डझन केळी असे खाद्य, सिध्दार्थ शिराळे, वैभव राऊत, ओंकार म्हेतर, अथर्व जाधव, सिध्दांत जिरगे, शिवतेज देसाई, गौरव सरनाईक, तनिष्क पुरवंत, विवेक पाटील यांच्यामार्फत जनावरांना खाऊ घालण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोरक्षणाची शपथ घेतली.
दरम्यान श्री गायत्री सेवाभावी संस्थेच्यावतीने गोरक्षणासोबतच जनावरांचे आरोग्य जपण्याचे काम केले जाते. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त या संस्थेच्या सुचित हिरेमठ, श्रीधर पाटील, शंभूराज पाटील, निखिल माने, निलेश खरबडे यांनी जनावरांना चारा दिला.
कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून उदय प्रभावळे यांच्या अन्नदान उपक्रमाला भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगरच्या पदाधिकार्‍यांनी बळ दिले. सीपीआर चौकात या परिसरातील रुग्णांचे नातेवाईक तसेच फिरस्ते आणि भुकेल्यांना अन्नदान करण्यात आले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्‍वजीत पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश पाटील- घरपणकर, भुषण कानकेकर, अभिषेक भोसले, तलहा मणेर, रोहित कारंडे, देवयानी पाटील, पृथ्वीराज पुरोहित, अनिरूध्द भुर्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन तसेच स्टेशन बाहेरील मार्गावरील बस स्टॉप, फुटपाथवरील फिरस्ते, व्यावसायिक यांना छत्री वाटप करण्यात आले. १०० छत्र्या यावेळी गरजूंना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्‍वजित पवार, सरचिटणीस वल्लभ देसाई, अनिकेत अतिग्रे, जयेश घरपणकर, तलहा मणेर, भूषण कानकेकर, अनिकेत सोलापुरे, पंकज बारड, अभिषेक भोसले, समर्थ चिले, देवयानी पाटील, निरंजन घाडगे, ऋषिराज पाटील, रोहित गोते, इब्राहिम मुजावर, यश उलपे, पृथ्वीराज पुरोहित, योगिराज सुतार उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी भाजप कार्यालयात कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, राहुल चिकोडे, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, सुनील वाडकर, प्रिया तेंडुलकर, माधुरी व्हटकर, अभिजित खतकर, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावर्डेकर, नामदेव वाईंगडे, हैबतराव नाईक-निंबाळकर यांच्यासह चंद्रकांत संकपाळ, तानाजी फाले, बाबा जांभळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जेष्ठ फुटबॉल खेळाडू शिवाजीराव पाटील, भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी, त्याशिवाय उत्तम बांडागळे, डॉ. अजय चौगुले, पृथ्वीराज मोरे, अभय तेंडुलकर, विजय महाडिक, अमर साठे, संग्राम पाटील, उद्योजक राजेश व्हटकर, रवींद्र कानकेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्या महेश चौगुले, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, किरण नकाते, नीलेश देसाई, विजय सूर्यवंशी, रवींद्र मुतगी, प्रसाद जाधव यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे सदस्य, विविध तरुण मंडळे आणि तालीम संस्थांचे पदाधिकारी, सेवा सोसायटी, दूध संस्था यासह कला-क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णराज महाडिक यांना शुभेच्छा दिल्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.2 ° C
28.2 °
28.2 °
83 %
9.2kmh
99 %
Wed
28 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page