Homeकला - क्रीडाबॅडमिंटन स्पर्धेत इशान, युवराज, प्रांशु, वंश, ऋषभ यांची विजयी सलामी

बॅडमिंटन स्पर्धेत इशान, युवराज, प्रांशु, वंश, ऋषभ यांची विजयी सलामी

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) यांच्या वतीने  आयोजित भारतीय बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘व्ही.व्ही. नातू मेमोरियल योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट २०२६’ (वरिष्ठ भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत) इशान रोहिल्ला, युवराज कुमार, प्रांशु शॉ, वंश देव, ऋषभ देशपांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.
भारतीय बॅडमिंटन संघटना आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली वेदांत स्पोर्ट्स अकॅडमी, ताथवडे, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत पुरुष गटात इशान रोहिल्लाने आशिष एचा १५-०९, १५-१२ असा तर, युवराज कुमारने भास्कर चक्रवर्तीचा १५-१३, १६-१४ असा पराभव केला. प्रांशु शॉ याने अंकुर सिन्हावर ०८-१५, १५-१३, १६-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उदघाटन अल्ट्रा कॉर्पोटेकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व वेदांत स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अशोक भोसले, वेदांत स्पोर्ट्स अकादमीचे एचआर विभागाचे मुख्य अमित काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे सरचिटणीस सीए रणजीत नातू, पीडीएमबीएचे उपाध्यक्ष सुशील जाधव, पीडीएमबीएचे खजिनदार सारंग लागू, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page