Homeकला - क्रीडाजागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहित चव्हाणला रौप्यपदक

जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहित चव्हाणला रौप्यपदक

कोल्हापूर :
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (योगासन), कोल्हापूरचा खेळाडू रोहित चव्हाण याने पहिल्या जागतिक योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतासाठी रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळविला आहे. ही स्पर्धा दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद येथील ट्रान्सस्टेडिया स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती.
रोहितची भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याने दि. ६ जून रोजी सुपायन प्रकारात सहभाग घेतला. या स्पर्धेत अमेरिका, इजिप्त, नेपाळ, इथिओपिया, कझाकिस्तान आणि जपानसह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत जपानच्या साईतो काजुहिरो याला ४१.७९ गुण मिळाले, तर रोहित चव्हाणने ४१.७८ गुणांची कमाई केली. अवघ्या ०.०१ गुणांच्या फरकामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. मात्र, त्याने रौप्यपदक पटकावत भारत आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले.
रोहित हा राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योगासन प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्याच्या या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा सुहास पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी रोहितचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page