Homeसामाजिकशेवगा संवर्धन कृतिशील उपक्रमाचे आयोजन

शेवगा संवर्धन कृतिशील उपक्रमाचे आयोजन

कोल्हापूर :
येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्ग मित्र परिवार व आदर्श सहेली मंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी व शाश्वत विकास वर्ष्यानिमित्त शेवगा संवर्धन कृतिशील उपक्रमाचे आयोजन निसर्ग प्रेमींच्या मागणीनुसार केले आहे.
या उपक्रमाचा कालावधी ७ जून ते २९ जून असा राहणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शाहूपुरी येथील अक्षर आनंद वाचनालय येथे करण्यात आला. याठिकाणी नव्याने प्रकाशझोतात आणलेल्या  शेवगा हर्बल टी चे याचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित निसर्गप्रेमींना त्याचा आस्वाद दिला व त्याचे महत्व पटवून दिले. यावेळी उपस्थित सुरेश शिपुरकर, अनुराधा मेहता, दशरथ पारेकर, वासुदेव कुलकर्णी, ए. आय. बागवान, तनुजा व निहाल शिपुरकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या कालावधीमध्ये शेवगा लागवड व संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींच्या व स्थानिक संस्थांच्या मागणीनुसार शेवगा संवर्धन, शेवग्यापासून बनवले जाणाऱ्या पदार्थांची प्रात्यक्षिक, शेवगा पुस्तकाबद्दल जनजागृती, शेवगा पाककृती स्पर्धा असे नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.
तसेच संस्थेच्या वतीने देशी शेवगा वनस्पतीची रोपे तयार करण्यात आली आहेत. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकरी व निसर्गप्रेमींना रोपांचे व शेवग्याच्या बियांचे देखील वाटप करण्यात येणार आहे.  तरी इच्छुक निसर्गप्रेमी, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट, विविध संस्थांनी २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
9.1kmh
93 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page