Homeशैक्षणिक - उद्योग गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

गोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५२वा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांच्या हस्ते व प्रशासकीय मंडळाचे सदस्य, अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, औक्षण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. दयावर्धन कामत, धनाजी पाटील, डॉ. प्रकाश दळवी, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
9.1kmh
93 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page