• श्री दत्त वाचनालयच्या पुस्तक भेट लकी ड्रॉ योजनेची सोडत जाहीर
कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पुस्तक भेट लकी ड्रॉ योजनेच्या सोडतीत श्री दत्त साखर कारखान्याच्या वर्कशॉप विभागातील कर्मचारी अनिकेत देवगोंडा बेल्ले हे १००० रुपयांच्या पुस्तकांच्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. लवकरच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगरच्या वतीने वाचन संस्कृती वाढवणे व वाचन चळवळीला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने ही पुस्तक भेट लकी ड्रॉ योजना राबवली होती. श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते या योजनेच्या लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली.
सुनील इनामदार यांनी प्रास्ताविकात वाचन चळवळीचे महत्त्व, लकी ड्रॉ बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर श्री दत्त सार्वजनिक वाचनालय दत्तनगरचे अध्यक्ष, कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव माने देशमुख, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बनगे, सचिव अशोक शिंदे, अरुण पाटील, शक्तिजित गुरव, निलेश पाटील, जयदीप देसाई, ग्रंथपाल मारुती गाडीवडर यांच्या हस्ते चिठ्ठया उचलून सोडत काढण्यात आली.
आठशे रुपयांच्या पुस्तकांचे दुसरे बक्षीस निनाद माणगावे व सुनील मोरे यांना मिळाले. तर सातशे रुपयांच्या पुस्तकांची तिसरे बक्षिसे शशिकांत पाटील, सौ. अमृता खोत, जितेंद्र पाटील, श्रवणकुमार खोत यांना मिळाले आहे.
चौथे बक्षीस : नितीन पाटील, बाबासो कुरणे, बाळासो पाटील, इसाक मतवाल, बापूसो पाटील. पाचवे बक्षीस : मोहन बेग, प्रकाश पाटील, विश्वजीत शिंदे, शंकर कोरे, किशोरकुमार कांबळे, सौ. वैशाली कुरणे. सहावे बक्षीस : राजेंद्र केरीपाळे, संजय बिनीवाले, हरिवंश यादव, प्रवीण पाटील, बापू शिंदे, अर्जुन कणके, रावसो कांबळे. सातवे बक्षीस : गुलाब शेख, श्रीपती वाडीकर, संजय रोंगे, जगन्नाथ सावंत, दयानंद चौगुले, सलीम नंदगावे, संजय ढेकळे, प्रकाश जाधव यांना मिळाले आहे.
——————————
पुस्तक भेट लकी ड्रॉ योजनेचे अनिकेत बेल्ले पहिल्या बक्षिसाचे मानकरी
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

