कोल्हापूर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यावतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना साखर-पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेवक प्रसाद चव्हाण, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम सोलोखे, सुनील जाधव, रणजित मंडलिक, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अनिल पाटील, राहुल चव्हाण, रुपेश इंगवले, धैर्यशील जाधव, सुरेश माने, प्रशांत साळुंखे, अर्जुन आंबी, अल्लाउद्दीन नाकाडे, रियाज बागवान, धनाजी कारंडे, विजय जाधव, मंदार पाटील, कपिल केसरकर, उदय शिंदे, शैलेश साळोखे, कपिल पोवार, सौरभ कुलकर्णी, नितीन मुधाले, अजित कारंडे, अंकुश निपाणीकर, महिला आघाडीच्या शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, गौरी माळतकर, पूजा कामते, सना अत्तार, मीनाताई पोतदार, शिल्पा कुपटे, युवतीसेनेच्या नम्रता भोसले यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
शिवसेनेच्यावतीने राज्याभिषेक सोहळा उत्साहात
Mumbai
overcast clouds
27.8
°
C
27.8
°
27.8
°
81 %
7.8kmh
94 %
Sun
28
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

