कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावर्षीच्या “Inspired by Nature: For Climate, For Our Nature” या संकल्पनेला अनुसरून विविध फुलझाडे, औषधी व आयुर्वेदिक वनस्पती तसेच देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालय, कोल्हापूर येथील डॉ. गौतम माने, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथील डॉ. प्रल्हाद दराडे तसेच आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा येथील डॉ. केशव मोरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी डॉ. सुप्रिया पाटील, सरस्वती कांबळे, डॉ. विजय सदामते, अजय तरंगे, कादंबरी खांडेकर, संजना भालकर, संगीता माने, अतुल जाधव, संजीवनी पवार, रोहित माने तसेच त्रिशला तमाईचिकर, तेजस्विनी कांबळे, किरण पवार, अक्षय कांबळे आणि रवींद्र गुरव यांनी वृक्षारोपणामध्ये सहभाग नोंदविला.
——————————
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षणशास्त्र अधिविभागात वृक्षारोपण
RELATED ARTICLES
Mumbai
moderate rain
29
°
C
29
°
28.9
°
74 %
3.6kmh
2 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

